'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटर्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचा समावेश होता. दीपिकानं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला. तसेच तिनं एक खास नेकपिस देखील परिधान केला होता. आता ऑस्करच्या आफ्टर पार्टीसाठी दीपिकानं खास लूक केला आहे. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. पर्पल ड्रेस, मेसी बन आणि सिल्वर इअरिंग्स असा लूक दीपिकानं ऑस्करच्या आफ्टर पार्टीसाठी केला होता. दीपिकाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. दीपिकानं ऑस्करच्या आफ्टर पार्टीसाठी केलेल्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. And then the after… असं कॅप्शन दीपिकानं या फोटोला दिलं आहे. 'तू खूप सुंदर दिसत आहेस' अशी कमेंट दीपिकाच्या या फोटोला एका नेटकऱ्यानं केली. दीपिकाचा चाहता वर्ग मोठा आहे. दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.