बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. प्रियांकाची 'सिटाडेल' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांकाने नुकतीच या वेबसीरिजची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 'सिटाडेल' या सीरिजमध्ये प्रियाका एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. 28 एप्रिलला 'सिटाडेल'च्या पहिल्या दोन भागांचा प्रीमियर होणार आहे. प्रियांकाने 'सिटाडेल'चा फर्स्ट लुक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'सिटाडेल' या सीरिजमध्ये प्रियांका नादियाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'सिटाडेल' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना सायन्स फिक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे. 'सिटाडेल' या वेबसीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. प्रियांका लवकरच 'जी ले जरा' या सिनेमात कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.