‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील रिटा रिपोर्ट ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजानं तिच्या एका फोटोशूटचे फोटो शेअर केले.



प्रिया आहुजानं शेअर केलेल्या फोटोला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.



प्रियानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला.



प्रियानं फोटोला कॅप्शन दिलं, ' तुम्ही स्वत:वर इतका विश्वास ठेवा की, कोणाच्याही मतांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.'



प्रियानं इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला उत्तर दिलं.



तिनं पोस्टमध्ये लिहिलं,'मी शेअर केलेल्या फोटोला ट्रोल करणार्‍यांना मला हे सांगायचं आहे की, तुम्ही जे बोलता त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. '



'मी चांगली पत्नी किंवा आई आहे की नाही हे मालव आणि अरदास यांना ठरवू द्या. मला कोणतेही कपडे घालण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही.काय परिधान करावे, हे मी ठरवतो.' असंही पोस्टमध्ये प्रियानं लिहिलं.



2020 मध्ये प्रियानं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.



तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



वेगवेगळ्या लूकमधील फोटो प्रिया सोशल मीडियावर शेअर करत असते.