घोड्याचं नाव विराट असून तो 19 वर्षाच्या सेवेनंतर आज निवृत्त झाला आहे. गेल्या 13 वर्षांपासून भारताच्या राष्ट्रपतींना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान विराटकडे होता. भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणून विराटचा विशेष सन्मान केला आहे. विराटच्या गुणवत्तेसाठी आणि सेवांसाठी त्याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमंडेशन कार्डही देण्यात आलं आहे. दरम्यान आज प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या समारोपानंतर पीबीजीने विराटच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट चार्जरच्या रुपात राष्ट्रपतीच्या सेवेत गेल्या 13 वर्षापासून आहे. विराटने या अगोदर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांना प्रोटोकॉलनुसार सरमोनिअल परेड्सला Escort चा गौरव मिळाला आहे.