दीपिका पदुकोनचा ग्लॅमरस अंदाज; पाहा खास फोटो! 'आँखो मे तेरी...' असं गाणं वाजताच कारमधून उचरणारी, समोर जमलेल्या गर्दीला हात उंचवत अभिवादन करणारी शांतिप्रिया तुम्हाला आठवतेय का? अर्थात आठवतच असेल. ही शांतिप्रिया दुसरी तिसरी कोणी नसून, ती आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण. अतिशय कमी कालावधीत हिंदी कलाविश्वात आणि ओघाओघानं आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नाव मोठं करणाही ही देखणी अभिनेत्री. दीपिकानं साकारलेल्या बहुतांश भूमिका तितक्याच वेगळ्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या. मग ती पिकू असो, शांतिप्रिया असो किंवा मग ऐतिहासिक रुपातील राणी पद्मावती आणि मस्तानी असो. प्रत्येक भूमिका ती खऱ्या अर्थानं जगली.