नवरात्र आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महिलामंध्ये या सणात मोठा उत्साह पाहायला मिळतो.
नवरात्र म्हणली की महिला उपवास करतात. मात्र एखादी महिला जर गर्भवती असेल तर मात्र तिने काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.
खरे तर उपवास ठेवल्याने शरीराला मोठे फायदे होतात. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
पण तुम्ही उपवासाच्या दरम्यान योग्य तो आहार घेतला नाही तर तुम्हाला थकवा, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
नवरात्रीमध्ये गर्भवती महिलांनी पूर्ण 9 दिवस उपवास करणे टाळावे. जास्त वेळ उपाशी राहिल्याने त्यांची तब्येत बिघडू शकते.
जर गरोदर महिलांना उपवास करायचा असेल तर त्यांनी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करू नये.
गरोदर महिलांनी नवरात्रीच्या उपवासात पुरेसे पाणी प्यावे. त्यांनी स्वतःला हायड्रेटेड ठेवले पाहिजे.
गरोदर महिलांनी उपवासात दिवसा वेळोवेळी फळांचे सेवन करावे. तुम्ही जेवणादरम्यान स्नॅक्स म्हणून ड्राय फ्रूट्स घेऊ शकता.
नवरात्रीच्या उपवासात गर्भवती महिलांनी प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की चीज, दही आणि बदाम सेवन करावे.
उपवासात जास्त वेळ रिकाम्या पोटी राहू नये. दर 2-3 तासांनी काहीतरी खावे. असे केल्याने डोकेदुखी, अॅसिडीटी सारख्या समस्या दूर राहण्यास मदत होऊ शकते.