बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रियांकाने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तापसीवर सनातन धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप आहे. छत्रीपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकलव्य गौर नामक व्यक्तीने तापसी पन्नू विरोधात तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना खूप बोल्ड ड्रेस परिधान केला होता. तसेच लक्ष्मी देवीचा फोटो असलेलं लॉकेटही तापसीने घातलं होतं. तापसीच्या या वागणुकीमुळे सनातन धर्माच्या भावना दुखावल्या असून त्यांनी तापसी पन्नूविरोधात तक्रार दाखल केली आहे. तापसी लवकरच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'डंकी' या सिनेमात झळकणार आहे. शूजित सरकारच्या 'पिंक' या सिनेमामुळे तापसीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे.