आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. प्राजक्ता नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर आपले खास लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्तानं या फोटोंमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. प्राजक्ता या फोटोमध्ये खुप ग्लॅमरस दिसतेय.