मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.



प्राजक्ता ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांना देते.



नुकतीच प्राजक्तानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून प्राजक्तानं तिच्या फार्म हाऊसची माहिती दिली आहे.



कर्जतमधील फार्म हाऊस प्राजक्तानं विकत घेतलं आहे.



प्राजक्तानं तिच्या फार्म हाऊसच्या बाहेरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'स्वप्न साकार… Happy owner of my dream “Farm House” डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे, एवढीच अट होती.'



'अगदी मनासारखं घर मिळालं. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”. 1- प्राजक्तप्रभा, 2- प्राजक्तराज 3- प्राजक्तकुंज, प्राजक्तत्रयी पुर्ण. खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत..फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या.' असंही प्राजक्तानं सांगितलं.



प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल आहे.



फुलवा खामकर, अमृता खानविलकर, सलील कुलकर्णी, ऋतुजा बागवे या सेलिब्रिटींनी प्राजक्ताच्या पोस्टला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.



प्राजक्ताचे चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट बघत असतात.



जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.



Thanks for Reading. UP NEXT

जाणून घ्या हर्षदा खानविलकरबद्दल

View next story