अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. 'तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली, तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?' भूमीनं ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. भूमी यश कटारियाला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. पण भूमीनं याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा या चित्रपटामधून भूमीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. टॉयलेट: एक प्रेम कथा,बधाई दो, पती पत्नी और वो आणि गोविंदा नाम मेरा या चित्रपटांमध्ये भूमीनं काम केलं आहे.