अभिनेत्री हर्षदा खानविलकर ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



रंग माझा वेगळा, पुढचं पाऊल, ऊन पाऊस यांसारख्या मालिकांमध्ये हर्षदानं काम केलं आहे.



हर्षदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात हर्षदाच्या बालपणाबद्दल...



हर्षदा खानविलकरनं एका मुलाखतीमध्ये तिच्या बालपणाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, 'मध्यमर्गीय कुटुंबात माझं बालपण गेलं. दहा बाय दहाच्या घरात माझं बालपण गेलं. पैशाची चणचण असायची. माझ्या वडिलांनी मला खूप स्वातंत्र दिलं.'



हर्षदा खानविलकरनं मुलाखतीमध्ये तिच्या पहिल्या मालिकेबद्दल सांगितलं, 'माझे एक फॅमिली फ्रेंड होते. त्यांनी माझे काही फोटो काढले होते. त्यामधील एक फोटो एका मासिकामध्ये छापून आला होता.'



पुढे हर्षदा म्हणाली, 'तो फोटो नीना गुप्ता यांनी पाहिला होता. नीना गुप्ता यांनी मला फोन करुन दर्द नावाच्या मालिकेबद्दल विचारलं होतं. त्या मालिकेत मी काम केलं.'



'पुढचं पाऊल' या मालिकेतील अक्कासाहेब या भूमिकेमुळे हर्षदाला विशेष लोकप्रियता मिळाली.



अस्तित्व एक प्रेम कहानी, ऑल द बेस्ट, कमांडर या हिंदी मालिकांमध्ये देखील हर्षदा खानविलकरनं काम केलं आहे.



सौंदर्या इनामदार या रंग माझा वेगळा या मालिकेत हर्षदानं साकारलेल्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.



हर्षदाच्या मालिका प्रेक्षक आवडीनं बघतात.



Thanks for Reading. UP NEXT

नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल

View next story