दिवसा डुलकी किंवा पॉवर नॅप घेण्याबद्दल अनेक मते आहेत.



काही लोक याला फायदेशीर मानतात तर काहींना हे आरोग्यासाठी हानिकारक मानतात.



युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन आणि युनिव्हर्सिटी ऑफ रिपब्लिक ऑफ उरुग्वे येथील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात दिवसा नियमित झोपणे आणि मेंदूचे एकूण प्रमाण यांच्यात मजबूत संबंध आढळून आला.



नव्या संशोधनानुसार, वामकुक्षी म्हणजेच दुपारच्या वेळेची डुलकी मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.



दिवसा डुलकी घेतल्याने स्मृतिभ्रंश आणि न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांचा धोका कमी होतो.



संशोधनानुसार, नियमित वामकुक्षी घेतल्यामुळे मेंदूचं संकुचन होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.



याआधी डुलकीचे फायदेशीर परिणाम दिसून आले आहेत. पण, डुलकी आणि मेंदूच्या आरोग्याचा थेट संबंध सापडल्याचं पहिल्यांदाच समोर आलं आहे.



या अभ्यासात संशोधकांना असं आढळून आलं की, जे लोक डुलकी घेण्यास प्राधान्य देतात त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होतो.



30 मिनिटे किंवा त्याहून कमी वेळ डुलकी घेणं आणि दिवसा लवकर झोपणे यामुळे रात्रीच्या झोपेमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता कमी होते.



संशोधकांनी दावा केला आहे की, या अभ्यासात नियमित डुलकी आणि मेंदूची यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट होतो.