अनन्या पांडेचं सिझलिंग फोटोशूट बॉलीवुडमधील चुलबुली अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतच एक नवं फोटोशूट केलं आहे. गोल्डन ड्रेस घालून अनन्याने काही फोटो काढले असून तिने ते शेअर केले आहेत. अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर हे सारे फोटो शेअर केले आहेत. अनन्या नुकतीच गेहराईंया या चित्रपटात दीपिका, सिद्धांत चतुर्वेदी यांच्याबरोबर झळकली होती. काही वर्षांपूर्वीच बॉलीवुडमध्ये पदार्पण केल्यानंतरही अनन्याचे अनेक चाहते आहेत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनन्या चांगलीच सक्रिय असते. यात सर्वाधिक ती इन्स्टावर अपडेटेड असते ती विविध लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.