'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंतने 28 नोव्हेंबर 2023 रोजी जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती.
अखेर अभिनेत्रीने आज तिच्या जोडीदाराचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.
पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे.
सिद्देशसोबतचे रोमँटिक फोटो पूजाने शेअर केले आहेत.
फोटो शेअर करत पूजाने लिहिलं आहे,आयुष्याचा नवा अध्याय तुझ्यासोबत सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
पूजाने शेअर केलेल्या पोस्टवर भाऊजी नमस्कार, लक्ष्मी नारायणाचा जोडा, अशा कमेंट्स करत अभिनेत्रीचं आणि सिद्देशचं अभिनंदन केलं आहे.
पूजा सावंतने तिचं रिलेशन कायम गुलदस्त्यात ठेवलं.
पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
पूजाच्या लग्नसोहळ्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.