सचिन तेंडुलरकरची लेक सारा ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सारा तेंडुलकरच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. आता शिक्षणामुळे सारा चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकरने मास्टर्स पूर्ण केलेय. सारा तेंडुलकरने लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलेय. साराची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. सारा तेंडुलकरने लंडनमध्ये ‘कॉलेज ऑफ लंडन’येथे वैद्यकशास्त्रातून (मेडिसीन) मास्टर्स पूर्ण केलेय. साराने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. सारा तेंडुलकर या कोर्समध्ये 75 टक्क्यांहून (डिस्टिंक्शन) अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झालेली आहे.. साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ येथे झालं आहे. 2018 मध्ये लंडनमध्येच साराने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर आता तीने मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलेय.