'कलरफुल' पूजा सावंतला अखेर तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे.
सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत पूजाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
पूजाचा जोडीदार नक्की कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
पूजा सावंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
काही दिवसांपूर्वी भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना पूजा म्हणालेली,माझा लिव्ह इनपेक्षा लग्नसंस्थेवर विश्वास आहे.
पूजा पुढे म्हणालेली,मला लग्न करायचं आहे. आयुष्यात स्थिरता हवी आहे. त्यामुळे ज्याच्यासोबत उरलेलं आयुष्य आनंदात घालवू शकते असा पार्टनर हवा आहे.
पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं.
पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
पूजा सावंतवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.