अभिनेत्री पूजा सावंतचा 'पोस्टर बॉईज 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पूजा सावंत मराठमोळी अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.

'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

'लपाछपी' सिनेमातील पूजाच्या अभिनयासाठी तिला 'दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

पूजा सावंतच्या 'दगडी चाळ' या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे.

कलरफुल पूजाचा मोठा चाहतावर्ग आहे.

'गोंदण', 'पोस्टर बॉय', 'सतरंगी रे', 'क्षणभर विश्रांती', 'आता गं बया', 'साटं लोटं पण सगळं खोटं', 'नीळकंठ मास्तर', 'दगडी चाळ', 'दगडी चाळ 2' पूजाचे हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

संजय जाधवसोबत काम करण्याची पूजा सावंतची इच्छा आहे.

पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

पूजा सावंतचा 'बळी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.