खतरों के खिलाडी सीझन 12 चा 25 सप्टेंबर रोजी ग्रँड फिनाले होणार आहे. येथे या हंगामातील सर्व स्पर्धक सहभागी होणार आहेत. शोचा होस्ट रोहित शेट्टीने त्याच्या खास पाहुण्यांनाही शोमध्ये आमंत्रित केले आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि पूजा हेगडे यांचा समावेश आहे. ग्रँड फिनाले एपिसोडमध्ये रणवीर सिंगने स्पर्धकांसोबत खूप मस्ती केली. खतरों के खिलाडीच्या ग्रँड फिनालेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये पूजा हेगडे रणवीर सिंगला बॉलिवूडची पम्मी आंटी म्हणताना दिसत आहे. शोच्या शेवटच्या भागात रणवीरने सांगितले की त्याने संपूर्ण शो पाहिला आहे आणि तो सर्व स्पर्धकांबद्दल देखील सांगू शकतो. रणवीर हा बॉलिवूडची पम्मी आंटी आहे कारण तो जवळजवळ सर्वांना ओळखतो असे पूजा हेगडे म्हणाली. पूजा हेगडेचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. पूजा हेगडेने बॉलिवूडची पम्मी आंटी म्हटल्यानंतर रणवीरला देखील पसू आवरेना. पूजाच्या या उपमेवर रणवीर पोट धरून हसला.