भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: PTI

अलीकडेच ए डी आर चा अहवाल समोर आला आहे

Image Source: PTI

ज्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेचा तपशील दिला आहे

Image Source: PTI

हा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सनं केला आहे.

Image Source: PTI

या अहवालात देशातील 30 मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेची माहिती दिली आहे.

Image Source: PTI

या माहितीनुसार, देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे, हे सविस्तर जाणून घेऊयात...

Image Source: PTI

देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री दक्षिण भारतातील एका राज्याचे आहेत.

Image Source: PTI

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.

Image Source: PTI

एडीआरच्या अहवालानुसार, त्यांची मालमत्ता सुमारे 936 कोटी रुपये आहे.

Image Source: PTI

चंद्रबाबू नायडू यांच्या संपत्तीचा एक भाग हेरिटेज फूड्स लिमिटेडमधील त्यांच्या भागीदारीतून येतो

Image Source: PTI

नायडू यांनी या कंपनीची सुरुवात 1992 मध्ये केली होती, आणि त्यांची पत्नी या कंपनीचे कामकाज पाहतात.

Image Source: PTI