भाजपने महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे



सीपी राधाकृष्णन यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तमिळनाडूतील तिरुपूर इथे झाला.



सीपी राधाकृष्णन यांनी Business Administration मधून आपली पदवी घेतली.



त्यांच्याकडे त्यांच्या गृहराज्यात चार दशकांपेक्षा जास्त राजकीय अनुभव आहे.



आरएसएसमधून सुरुवात करत त्यांनी 1974 मध्ये भाजपचे पूर्ववर्ती भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य झाले.



सीपी राधाकृष्णन 1996 साली तमिळनाडू भाजपचे सचिव बनले आणि 1998 आणि 1999 मध्ये कोईम्बतूरमधून लोकसभेसाठी निवडून आले



त्यांनी 2004 मध्ये न्यूयॉर्क येथे संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले.



ते 2004-2007 पर्यंत तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते



त्यांनी 18 फेब्रुवारी 2023 ते 30 जुलै 2024 पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून काम केले



ते 31 जुलै 2024 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत