अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे घरी औक्षण करण्यात आले.
माझ्यावर विश्वास दाखवून मला सहाव्यांदा तिकीट दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ एक नवीन गाणे समोर आले आहे. या गाण्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे.
तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आधुनिक अभिमन्यू म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीवर टीका करताना फडणवीस म्हणाले, विरोधकांचा पराभव करण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी पुरेशा आहेत.
अर्ज भरण्याच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांचासोबत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्ज दाखल करत असताना 'एक्स' या सोशल मीडियावर #DevaBhau हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल केला.
ये मेरा छठवा चुनाव है, और पिछले पाँच चुनावों में था वैसे ही आज भी मेरी माता जी का और जनता का आशीर्वाद मेरे सर पर है.. अशी माहिती त्यांनी इंस्टाग्राम द्वारे दिली.