महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: @rajesh_tope777 | Instagram

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गुरुवारी (दि.25) 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

Image Source: @rajesh_tope777 | Instagram

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राजेश टोपे यांना पुन्हा एकदा घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे.

Image Source: @rajesh_tope777 | Instagram

राजेश टोपे यांच्या नावावर असलेली शेतजमीन व्यावसायिक बांधकामाचे आजचे बाजार मूल्य 65 कोटी 90 लाख 41 हजार 353 एवढ आहे.

Image Source: @rajesh_tope777 | Instagram

राजेश टोपे यांच्याकडे 12 लाख 50 हजार 556 रुपयांची रोख असून त्यांच्या पत्नी मनीषा टोपे यांच्या कडे 7 लाख 84 हजारांची रोख आहे.

Image Source: @rajesh_tope777 | Instagram

राजेश टोपे यांच्याकडे एक फॉर्च्युनर गाडी, 4 ट्रॅक्टर दोन ट्रेलर आणि एक ट्रक अशी वाहने आहेत.

Image Source: @rajesh_tope777 | Instagram

राजेश टोपे आणि त्यांच्या पत्नी कडे एकुण 3 किलो 732 ग्रॅम एवढे सोन असून, 3 किलो 225 ग्रॅम चांदी त्यांच्या कडे आहे.

Image Source: @rajesh_tope777 | Instagram

विशेष म्हणजे राजेश टोपे यांच्यावर 4 कोटी 2 लाख 47 हजारांचे, तर त्यांच्या पत्नी मनीषा टोपे यांच्या वर 4 कोटी 99 लाख 41 हजारांचे कर्ज आहे.

Image Source: @rajesh_tope777 | Instagram

राजेश टोपे यांचे वार्षिक उत्पन्न 3 कोटी 3 लाख दोन हजार एवढे दाखवण्यात आले असून मनीषा टोपे यांचे 42 लाख 80 हजार 423 रुपये एवढे वार्षिक उत्पन्न.

Image Source: @rajesh_tope777 | Instagram