शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये चड्डी बनियनवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

एबीपी माझाने या मारहाणीविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Image Source: ABP MAJHA

आज (16 जुलै) संजय गायकवाड यांच्या मारहणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.

Image Source: ABP MAJHA

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे सतेज पाटील सहभागी झाले.

Image Source: ABP MAJHA

महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती जोरदार आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात एकच घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला.

Image Source: ABP MAJHA

“चड्डी बनियन गँग हाय हाय”, “या गुंडाराज सरकारचं करायचं काय?”, “खाली डोकं वर पाय”, “या लुटारू सरकारचं करायचं काय?”, अशा घोषणा देण्यात आल्या.

Image Source: ABP MAJHA

या आंदोलनामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधातील बॅनर सुद्धा लक्ष वेधून घेत होता.

Image Source: ABP MAJHA

“महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो” असा बॅनर, संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटोसह झळकला.

Image Source: ABP MAJHA

दुसरीकडे विधानसभा अधिवेशनाचा कालावधी तीन दिवस राहिलेला असतानाही आतापर्यंत विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही.

Image Source: ABP MAJHA

त्यामुळे आज दिवसभरात पडसाद उमटणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Image Source: ABP MAJHA