अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? संभाव्य मंत्र्यांची यादी एका क्लिकवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदं येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालंय.
महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत 236 जागा मिळवल्या आहेत.
दरम्यान महायुतीने मोठा विजय मिळवला असला तरी अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय झालेला नाही.
मात्र, आज एकनाथ शिंदे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, ते मान्य असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे बोलले जात आहे.
दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 कॅबिनेट मंत्रिपद आणि 3 राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
यामध्ये धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, अजित पवार, छगन भुजबळ या सात नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनच होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.
पुढील 2-3 दिवसांत मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे.