दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे अरविंद केजरवील आणि भाजपच्या परवेश वर्मा यांच्यात लढत झाली होती.

Image Source: pexel

यामध्ये परवेश वर्मा यांनी 1844 मतांनी विजयी मिळवला आहे. त्यामुळे जायंट किलर म्हणून परवेश वर्मा यांच्याकडे पाहिलं जात आहे. या विजयानंतर परवेश वर्मा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहचले आहेत.

Image Source: pexel

परवेश वर्मा यांना 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारले होते, पक्षाच्या नेत्यांकडून त्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन मिळाले होते.

Image Source: pexel

ऐवजी जनकपुरीचे आमदार जगदीश मुखी यांनी पश्चिम दिल्लीत निवडणूक लढवली. द्वारका येथे 22 मार्च 2009 रोजी आयोजित महापंचायतमध्ये परवेश यांना तिकीट नाकारण्याच्या भाजपच्या निर्णयाचा निषेध केला होता.

Image Source: pexel

परवेश वर्मा यांची पत्नी स्वाती सिंग या माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशातील भाजप नेते विक्रम वर्मा यांची मुलगी आहे. त्यांना 2 मुली आणि एक मुलगा अशी 3 अपत्ये आहेत.

Image Source: pexel

कोण आहे परवेश वर्मा?

- दिल्ली विधानसभा निवडणुकीत परवेश वर्मा यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली
- परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा निवडूक लढवून बाजी मारली

Image Source: pexel

- परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत
- 48 वर्षीय परवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीचे माजी खासदार आहेत
- परवेश वर्मा 2014 आणि 2019 असे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

Image Source: pexel

- 2019 मध्ये दिल्लीच्या इतिहासत सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे खासदार म्हणून परवेश यांनी विजय मिळवला होता. त्यांना 5 लाख 78 हजार 486 इतकं मोठं मताधिक्य मिळालं होतं.

Image Source: pexel

परवेश वर्मा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत-
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला.

Image Source: pexel

परवेश वर्मा म्हणाले की, दिल्लीतील जाट नेते, बंधू आणि भगिनी भाजपसोबत आहेत. दिल्लीचा विकास फक्त भाजपच करू शकते.

Image Source: pexel

जाट आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी राज्य सरकारला सभागृहातून कायदा करून केंद्राकडे पाठवावा लागेल, जे त्यांनी कधीही केले नाही. अरविंद केजरीवाल सतत खोटे बोलत आहेत, असा आरोप परवेश वर्मा यांनी केला आहे.

Image Source: pexel