राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस बजावण्यात आलीये.

दरम्यान रोहित पवार यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

याआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती.

तसेच नुकतचं त्यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते.

केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होतं.

त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तसेच यानंतर रोहित पवार चौकशीला हजर राहणार हे पाहणं देखील गरजेचं ठरेल.

बारमती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी कोली होती.

आमदार रोहित पवार यांची ही बारामती अॅग्रो कंपनी आहे.बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात आला.

मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना नोटीस बजावण्यात आली होती.आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आलीये.