आमदारांना मिळणाऱ्या घराबाबत कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे म्हणतात
मुख्यमंत्री आणि मंत्रीमहोदयांना मी कळवणार आहे की, मला हे घर नकोय आणि स्वेच्छेने मी हे घर देऊन टाकते.
घरांसाठी बऱ्याच आमदारांची मागणी होती. अनेक आमदार ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना मुंबईत घरे नसतात.
माझ्यासारखे काही आमदार आहेत ज्यांची मुंबईत घरे आहे. त्यामुळे त्यांना घराची गरज नाही. मला या सदनिकेची गरज नाही.
उलट सध्या असलेल्या आमदार निवासाचा वापर माझ्या मतदारसंघातले रुग्ण, गरजू जेव्हा मुंबईत जातात तेव्हा त्याचा वापर करतात.
त्याप्रमाणे ज्या आमदारांना ही घरे नको आहेत त्याचा वापर रुग्णासाठी, लोकांसाठी तसेच औषधोपचारासाठी वापरावा.
आम्ही लोकांसाठी राजकारणात आलोय, त्यामुळे ज्यांना गरज नाही त्यांनी घर घेणे चुकीचे ठरेल.
यामुळे मी इतर आमदारांना आवाहन करते की त्यांनी यावरील हक्क सोडावा. मुंबईत आमदारांना देण्यात येणारे स्वीकारणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे.