बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा 'आरआरआर' हा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियानं खास लूक केला आहे. सब्यसाची मुखर्जी डिझाइन केलेली ऑरेंज साडी, हिरवी बिंदी आणि लाइट मेक-अप असा लूक आलियानं केला होता. रिपोर्टनुसार, फ्लोवर प्रिंटेड ऑरेंज आणि ब्लॅक रंगाच्या या साडीची किंमत 69 ते 72 हजारांच्यामध्ये आहे. आरआरआर या चित्रपटामध्ये आलिया भट्टसोबतच अजय देवगन , ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आलियाच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आलियाचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.