अकोल्यात बोगस कृषी उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई, कारखाना चालवणारा 'मास्टरमाईंड' मोकाट शिसा बोंदरखेड मार्गावरील एका शेतात विनापरवाना शेती उत्पन्न वाढवणारी खते, टॉनिक बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई कारवाईत पाच लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीचा बोलवता धनी अकोल्यातील एक मोठा कृषी व्यावसायिक असल्याची मोठी चर्चा कृषी व्यावसायिकाच्या सहभागाचे धागे-दोरे दोन्ही विभागांना मिळाले नाहीत पोलीस आणि कृषी विभागाची बोगस कृषी कारखान्यावर कारवाई शेतकऱ्यांना बोगस कृषी साहित्य, खते आणि निविष्ठ बनवण्याचा गोरखधंदा सुरु होता. शेती उत्पन्न वाढवण्याचा दावा करणारी बनावट खतं, टॉनिक बनवलं जात होतं पोलीस आणि कृषी विभागाची बोगस कृषी कारखान्यावर कारवाई विनोद हिवराळे हा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता शेतीचे उत्पन्न वाढवणारे उत्पादने बनवत होता.