सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरु आहे. वाढत्या उन्हाच्या तापमानात अनेक शारीरिक समस्याही उद्भवू लागतात. ष्माघात ही हंगामी समस्या असू शकते. पण, त्यावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो. उष्माघातानंतर शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही आणि तापमान सतत वाढत जाते. शरीराचे तापमान वाढल्यानंतरही घाम येत नाही. त्वचेवर लाल खुणा, पुरळ दिसू शकतात. हृदयाचे ठोके जलद होतात. डोकेदुखी कायम राहते. ही लक्षणं दिसू लागतात. यावर उपाय म्हणजे, सर्वप्रथम थंड ठिकाणी झोपा. पण एसी जास्त वेगाने चालू करू नका. शरीराला श्वास घेऊ द्या. आपला श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न करा आणि ताजे पाणी प्या. इलेक्ट्रॉल द्रावण, लिंबूपाणी पिणे सर्वात फायदेशीर आहे. सोडा, कोल्ड ड्रिंक, चहा आणि कॉफी यांपासून शक्यतो दूरच राहा. हे शरीरातील पाण्याची पातळी कमी करतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.