अभिनेता रणवीर सिंह कायम त्याच्या वेगळ्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असतो नुकतंच रणवीरने आयपीएल सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती यावेळी रणवीर सिंहचा फंकी कॅज्युअल अंदाज पाहायला मिळाला रणवीरने यावेळी जांभळ्या रंगाचं प्रिंटेड शर्ट घातलं होतं या शर्टावर पांढऱ्या रंगाची डिझाईन आहे याला जोड देत रणवीरने जांभळ्या रंगाची पँट, मॅचिंग गॉगल आणि पांधरी टोपी घातली होती यासह रणवीरने गळ्यात पांढऱ्या रंगाची माळही घातली होती सध्या रणवीर सिंह त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे 'जयेशभाई जोरदार' चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे 'जयेशभाई जोरदार' या सिनेमात शालिनी पांडे मुख्य भूमिकेत आहे या सिनेमाच्या माध्यमातून शालिनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे