श्रावण सुरु झाला असून उद्या पहिला श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

याच पार्श्वभूमीवर त्र्यंबक प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून श्रावण महिन्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पार्किंग, सीसीटीव्ही, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आदींसह

कुशावर्त स्नान आणि ब्रम्हगिरी फेरीच्या निमित्ताने चोख नियोजन केले आहे.

त्र्यंबकेश्वरला श्रावण महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी देशभरातून दाखल होत असतात.

श्रावण मासात ब्रम्हगिरी प्रदक्षिणा, कुशावर्त स्नान

ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शन यासह काही भाविक ब्रम्हगिरीवर जाऊन आनंद घेत असतात

या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यात मोठी गर्दी होते.

चारही वाहनतळावर आरोग्य पथक नियुक्त असेल. यासाठी डाॅक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक आदी तैनात असतील