उन्हाळ्यात चेहऱ्यावर सनबर्न, पिंपल्स आणि पुरळ उठू लागतात.



उन्हाळ्यात चेहरा वारंवार धुतल्यानंतरही चेहरा तेलकट आणि निस्तेज होतो.



अशा वेळी तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी तुमच्या पाण्याच्या बाटलीत पुदिन्याची काही पाने टाकून ठेवा.



पुदिन्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येत नाहीत.



उन्हाळ्यात चेहरा निर्जीव होतो. त्वचेची चमक नाहीशी होते. अशा वेळी पुदिन्याचे पाणी प्यायले तर त्वचा एकदम फ्रेश राहते.



पुदिन्याचे पाणी प्याल तर त्याचा फायदा तुम्हाला गॅस, जळजळ किंवा पोटाच्या इतर कोणत्याही समस्यांमध्येही होतो.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.