पॅराग्लायडिंग, स्कायडाविंग सोबतच रिव्हर राफ्टिंग देखील एक साहसी खेळ आहे. यामध्ये नदीच्या मोठमोठ्या लाटांवर नदीतून तरंगत जावे लागते. पण जर तुम्हाला रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही 'या' ठिकाणी नक्की भेट द्या. ऋषिकेशमध्ये गंगा नदीमध्ये तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा साहसी अनुभव घेऊ शकता. सिक्कीममधील तिस्ता आणि दार्जिलिंगमधील कालिंपाँग नदीमध्ये तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेऊ शकता. पश्चिम भारतातील कुंडलिक नदीमध्ये तुम्ही रिव्हर राफ्टिंग करु शकता. अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करण्यास मिळते. हिमाचल प्रदेशातील स्पिटी व्हॅलीमध्ये रिव्हर राफ्टिंग करता येते. कर्नाटकातील दांडेलीमधील काली नदीमध्ये देखील रिव्हर राफ्टिंग करायला मिळते. मनालीच्या व्यास नदीमध्ये तुम्ही हा अनुभव घेऊ शकता.