अमरनाथ यात्रेआधी अमरनाथ गुहेतून शिवलिंगाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंतून भाविकांनी बाबा बर्फानी यांची पहिली झलक पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये अमरनाथ गुहेतील नैसर्गिकपणे तयार झालेलं हिम शिवलिंग पूर्ण आकारात दिसत आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्यास अजून महिना बाकी असून सध्या यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्यासाठी एक महिना बाकी असून अधिकारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी अमरनाथ गुहेत जाऊन सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी पाहणी केली. यावेळी त्यांनी पवित्र शिवलिंगाचे फोटो शेअर केले आहेत. अमरनाथ गुहेतील समोर आलेल्या फोटोमध्ये पवित्र शिवलिंगासोबतच माता पार्वती आणि श्री गणेश याचं प्रतीक मानलं जाणारं हिमस्तंभही पूर्ण आकारात दिसत आहे. अमरनाथ यात्रेचा मार्ग तयार करण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. श्राइन बोर्ड आणि सुरक्षा दलाचे अधिकारी बंदोबस्तासाठी गुहेत पोहोचले आहेत.