अभिनेत्री मौनी रॉयने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मौनीचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. मात्र, ती तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. वास्तविक, अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा हॉट आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा मौनीचा नवा लूक चर्चेत आला आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांमध्ये शेअर केली आहे. यामध्ये तीने मरून कलरचा गाऊन परिधान केलेला दिसत आहे. तिने हा ड्रेस काळ्या बूटांसोबत पेअर केला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. इथे ती बीचवर वेगवेगळ्या पोज देत आहे. मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या डान्स रियालिटी शो 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स'मध्ये दिसत आहे. या शोमध्ये अभिनेत्री जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. याशिवाय ती बऱ्याच दिवसांपासून अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाबाबतही चर्चेत आहे.