अंकिताच्या मेहेंदी सोहळ्याचे खास क्षण; पाहा Unseen फोटो छोट्या पडद्यारवची अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वी विकी जैनसोबत विवाहबंधनात अडकली आहे. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोन्ही लव्हबर्ड्स काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. विकी आणि अंकिताच्या विवाह सोहळ्यासोबतच प्री वेडिंग फंक्शन्स थाटामाटात पार पडले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नुकतेच अंकिताने तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो शेअर केलेत. अंकिता आणि विकी या फोटोमध्ये खूप खुश दिसत आहेत.