अभिनेत्री हिना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करतेय तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत यामध्ये ती न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना पाहायला मिळतेय हिना खान तिच्या न्यूयॉर्क व्हेकेशनचा खूप आनंद घेत आहे यासोबतच ती सुट्ट्यांचे अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत आहे हिना एकटी नसून ती तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत असल्याची माहिती आहे हिना आणि रॉकी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हिना खानच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये झळकल्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे