अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सिंघम गर्ल काजल अग्रवालने एका मुलाला जन्म दिला आहे. काजल अग्रवाल सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो काजलने सोशल मीडियावर शेअर केले होते. काजल अग्रवाल-गौतम किचलू यांचा विवाह 30 ऑक्टोबर 2020 रोजी झाला. काजल अग्रवाल आणि गौतम किचलूचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येत असतात. काजलचा पती गौतम किचलू हा एक इंटिरियर डिझाइनर आहे. काजल अग्रवालचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.