आयपीएल 2022 मधील तिसराव्या सामन्यात राजस्थाननं कोलकात्याला पराभूत करून या हंगामातील चौथा विजय मिळवला आहे.



कोलकात्याविरुद्ध ओबेड मॅकॉयनं भेदक मारा करत फलंदाजाला रोखलं. ज्यानंतर ओबेड मॅकॉय कोण आहे? अशी चर्चा रंगली



आयपीएल 2022 च्या तिसाव्या सामन्यात ओबेड मॅकॉयनं राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं.



आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थानच्या संघानं मॅकॉयला त्याची मूळ किंमत 75 लाखात विकत घेतलं.



ओबेड मॅकॉयचा जन्म 4 जानेवारी 1997 साली झाला.डाव्या हाताच्या कॅरेबियन गोलंदाजाची ताकद स्लोअर बॉल आहे. त्याचा वापर तो डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या प्रकारे करतो.



भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 2018 मध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत मॅकॉनची वेस्ट इंडीजच्या संघात निवड करण्यात आली होती.



त्यानं 8 मार्च 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला.