कर्नाटकात हिजाबवरून पेटलेलं रणकंदन हे आता थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचलं. अरुसा परवेझ ही जम्मू काश्मीर बोर्ड परीक्षेत पहिली आली. अरुसाला हिजाब घालण्याचा सल्ला सोशल मीडियावर दिला. तिला गळा चिरण्याच्या, ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. मी हृदयाने मुस्लिम, हिजाबची गरज नाही असं आरुसा म्हणते. ट्रोल करणाऱ्यांपेक्षा माझं 'अल्लाह'वरचं प्रेम जास्त असेल. अरुसाच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलंय.