सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केलेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. राष्ट्रीय स्तरावर गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत. तेल कंपन्यांनी सकाळी सहा वाजता अपडेट जारी केलेत. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.