आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं चढ-उतार होत आहेत. कच्च्या तेलाच्या दरांत आज मोठी उसळी पाहायला मिळाली. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल आज 4.05 टक्क्यांच्या वाढीसह 71.34 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करतंय. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतींतही 3.86 टक्क्यांची वाढ दिसून येतेय, ते प्रति बॅरल 75.30 डॉलरवर व्यापार करतंय. तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केलेत. आज सलग 349 वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. मे 2022 पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जातंय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.