आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरणीनंतरही अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.



पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवले जातात.



WTI क्रूड ऑइल (WTI Crude Oil) आज एक टक्क्यांनी घसरले असून आज WTI क्रूड ऑइल दर 69.26 डॉलरवर व्यापार करत आहे.



ब्रेंट क्रूड तेल (Brent Crude Oil) 1.21 टक्क्यांनी घसरलं असून प्रति बॅरल 74.99 डॉलरवर व्यापार करत आहे.



कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही आज इंधन दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत.



दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेशमध्ये दरवाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्रात दर स्थिर आहेत. देशात मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे आहेत.



कच्च्या तेलाच्या दरांवरील चढ-उताराचा इंधन दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.



दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर



मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर



दिल्लीपासून नोएडापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. नोएडामध्ये पेट्रोल 27 पैशांनी आणि डिझेल 26 पैशांनी महागलं असून ते 96.92 रुपये आणि 90.08 रुपयांना मिळत आहे.



तसेच, गुरुग्राममध्ये पेट्रोल 10 पैसे आणि डिझेल 10 पैशांनी महागलं असून 96.94 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लीटर आहे.