तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केलेत.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण दिसून आली.

बेंचमार्क ब्रेंट क्रूड 2.08 टक्क्यांनी घसरून 73.75 डॉलर प्रति बॅरलवर बंद झालं आहे.

एकीकडे अमेरिकेतील एकामागून एक बँक बुडत असताना, जागतिक मंदीची भीती पुन्हा एकदा संपूर्ण जगावर पसरली आहे.

पुन्हा एकदा जागतिक मंदीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

कच्च्या तेलाच्या दरांतही घसरण नोंदवली जातेय.

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर दिसला नाही.

तेल कंपन्यांनी आजही दरात कोणताही बदल केलेला नाही.

देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये, एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.