भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज संमिश्र पातळीवर झाली.



सेन्सेक्स किंचित वाढीसह उघडला, तर निफ्टीनंही किंचित वाढ नोंदवली.



ऑटो स्टॉक्समध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाली.



आज बँक शेअर्समध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.



सकाळी 9.22 वाजता सेन्सेक्स 144.88 अंकांच्या म्हणजेच 0.25 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत होता.



आरबीआयचे मौद्रीक धोरण, अमेरिकीतील बँकिंग व्यवस्थेतील बदल आणि संमिश्र जागतिक परिस्थितीचा परिणाम यामुळे शेअर बाजारात काहीशी अस्थिरता दिसून येतेय.



NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी आज 24.25 अंकांच्या म्हणजेच, 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 17,422.30 वर उघडला.



BSE चा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 11.73 अंकांच्या म्हणजेच, 0.02 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 59,094.71 वर उघडला.



सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्स तेजीत होते.



सेन्सेक्समधील 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.