आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल पुन्हा एकदा प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार होत आहेत. भारतीय बाजारात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. देशात आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच भारतात सर्वात महाग पेट्रोल-डिझेलच राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 113.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलीये. नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. तब्बल एक वर्षाहून अधिक काळापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. परंतु, कच्च्या तेलाच्या दरांत सतत होणाऱ्या चढ-उतारामुळे दरांत बदल होणार असल्याचं बोललं जात आहे.