आंतरराष्ट्रीय बाजारात आज पेट्रोल-डिझेलचे दर कडाडले आहेत.

ब्रेंट क्रूड ऑईल 80.21 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचलं आहे.

डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 75.83 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

आज क्रूड ऑईलच्या किमतींनी 80 चा आकडा पार केला आहे.

देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केलेत.

देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

भारतात सर्वात महाग पेट्रोल-डिझेलच राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय.

श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 113.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलीये.

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

तब्बल एक वर्षाहून अधिक काळापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

परंतु, कच्च्या तेलाच्या दरांत होणाऱ्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दरही पुन्हा वाढणार असल्याचं बोललं जात आहे.