मंगळवारी घेतलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली.
GST कौन्सिलच्या बैठकीत अनेक गोष्टींवरील GST वाढला, तर काही गोष्टींवरील कमी झाला.
चार वस्तूंचे जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत.
जीएसटी कायद्यात सुधारणा केल्यानंतर हे नवे कर लागू होणार आहेत.
ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28 टक्के GST लावण्याचा निर्णय
कार खरेदी करणं महागलं, सेडान कारवर 22 टक्के सेस लावला जाणार नाही.
आयात करण्यात आलेली कर्करोगाची औषधं स्वस्त, IGST लावला जाणार नाही
चित्रपट गृहांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त, GST 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
कच्च्या, न तळलेल्या, न शिजवलेल्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के
फिश पेस्टवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आलाय