पेट्रोल-डिझेलचे दर दररोज भारतीय तेल कंपन्या जारी करतात.



आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावर या किमती ठरवल्या जातात.



आज कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.



देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.



दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चारही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जुन्याच दरांवर कायम आहेत.



देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.



नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.



औरंगाबादमध्ये पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर आहे.



परभणीत 109.45 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.



कोल्हापुरात पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.